कसं आहे मित्रांनो,
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर" हे नाव आलं की भारतातील काही सभ्य सुसंस्कृत लोकांना
उलट्या जुलाब अपचन गॅसेस पोटशुळ पित्त डोकेदुखी दृष्टिदोष शॉर्टटर्म मेमरी लॉस वेडाचे झटके
नाच्या बनून अंगात येणे मस्तकशुळ असे अनेक अजीबोगरीब आजार उद्भवतात.
तर यावेळी कारण आहे.

10 किंग हेन्री रोड,लंडन स्थित प्रशस्त घर ज्यात डॉ.बाबासाहेब एक वर्षे वास्तव्यास होते ते घर.
आणि यावेळी आजारी पडलेत "अमित जोशी" "विक्रांत फडके""सुयोग पटवर्धन"
"अतुल भागवत" तर मुद्दा आहे ते घर खरेदी करण्याचा,जे राज्यसरकार 40 कोटी देवून खरेदी करणार आहे.

अमित जोशी यांनी त्यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.त्यापोस्टमधील जोशी आणि कंपनी यांची मते थोडक्यात
*एवढे पैसे खर्च करायचेच कशाला?
*प्रत्येक वेळच्या ह्यांच्या ब्ल्याकमेलिंगला
सरकारने बळी पडता कामा नये
*याना सगळे फुकट मिळवायची/मागायची सवय लागली आहे.
*बाबासाहेबांची गोष्ट वेगळी आहे,
त्यांनी 24 तासात भारताची घटना लिहिली तिथून
*तिथे जायला 6 डिसेंबरला एक मोफत ट्रेनही उपलब्ध करुन द्यावी
*आम्ही तिकीट काढून ट्रेन किंवा बसचा प्रवास करतो
दादागीरी करुन फुकट प्रवास करत नाही.
*उद्या उठून हज यात्रेप्रमाणे लंडन यात्रेसाठी सबसीडीची मागणी झाली नाही म्हणजे मिळवले.
*मागणी करणाऱ्याना उद्योग नसल्याने,
"रिकामा नाव्ही घरी तुंम्बड्या लावी" अशी काहीशी गत आहे या लोकांची...

या अपमानजनक हेटाळणीयुक्त मतांवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की यांचा सगळा राग हा बाबासाहेबांच्या नावाने
खरेदी करण्यात येणाऱ्या घरावरुन बाबासाहेबांवर आहे आणि या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसणाऱ्या आंबेडकरी जनतेवर आहे.हे आपल्याला काही नविन नाही.यांना अक्कल आहे असे हे दुनियाला भासवतात.पण ती खरेच असते काय?

हे कुणी तपासायचे?
श्रेष्ठत्वाचा जातीय गंड कुरुवाळत कायम शोषण केलेल्या शोषित समाजाला प्रत्येक पातळीवर हेटाळत रहायचे
हाच यांचा एकमेव धर्म आणि महान संस्कृती आहे.यांना काही बोलायचे म्हणजे धार्मिक पाप असते ते.
धर्म बुड़तो..हाहाकार होतो.पुरंदरेंच्यावेळी यांना तो ब्राह्मण द्वेष वाटत होता.
या सभ्य सुसंस्कृत लोकांचा हा कोणता द्वेष मानायचा? आपण दुसऱ्याचे दोष दाखवतो तेव्हा आपण आपले वर्तनही पहायला हवे.आपले मन आणि विचार शुद्ध आहेत का हे पहावे?
मग दुसरेही तुम्हाला तसे पाहण्याचा प्रयत्न करतील.

-आता प्रकरण पाहुया
डॉ.बाबासाहेबांचे लंडन मधील वास्तव्य केलेले घर.यात त्यांचे केवळ एक वर्षे वास्तव्य होते.जेव्हा हि बातमी आली तेव्हा मलाहीएक आंबेडकरवादी म्हणून आनंद झाला नाही.तर आश्चर्य वाटले.काय संबंध ते घर विकत घेण्याचा?
बरं आंबेडकरी समाजातून अशी कुणी मागणीही अजून केलेली नव्हती.ना केली आहे.
इकडे इंदुमिलचा प्रश्न अगोदरच प्रलंबित आहे.तो राहिला बाजूला हे मधेच काय नविन निघाले?
मग जेव्हा या बातमीच्या मुळाशी गेलो तेव्हा समजले भाजापाचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले
यांचे वक्तव्य की भाजपाचेच बोगसडिग्री(?)शिक्षणमंत्री श्री विनोद तावडेजी यांनी तशी मागणी केली असल्याचे मंत्रालयऑनलाइन वर आढळले.(नविन माहिती असल्यास कळवा)
हा मागणीचा मुद्दा क्लिअर झाला.
म्हणजे आंबेडकरी समाज किंवा कोणत्याही नेत्याने याअगोदर मागणी केलेली नव्हती.
याचा अर्थ हे मनुवादी सरकार स्मारकाचा खेळ करुन आपले विकृत राजकारण करत आहेत.
दूसरे काही नाही.प्रसारमाध्यमांत हि न्यूज वारंवार चालवली जातेय.
शेवटचे दोन दिवस बाकी एक दिवस बाकी..दिरंगाई वगैरे वगैरे बातम्या चालवून लोकांना भावनिक केले जातेय.
अरे कोणाला गरज आहे त्याची?
आमचा झोपडीत गावकुसाबाहेर राहणारा समाज या जन्मात तरी लंडनला जावू शकणार आहे काय?
ते चाळीस कोटी या समाजातील गरीब विद्यार्थी मुलांना देणार आहे का हे सरकार?
आमचे तर इंदुमिल स्मारकाबाबतही स्पष्ट मत आहे.ते केवळ प्रेक्षणीय स्मारक न बनवता
सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारे ज्ञानस्मारक म्हणून निर्माण व्हायला हवे.

आता निधीचे पाहू.
सदर घर विकत घेण्यासाठी लागणारा निधी हा मागासवर्गीय महामंडळातूनच जमा करण्यात येणार आहे
याचा अर्थ मागास समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या उन्नतीसाठीचा तरतूद केलेला पैसा
इकडे वळविण्यात आला आहे.मग यात कुणाच्या बापाचे काय गेले सांगा? पण सनातन्याचा पोटशुळ हा की
केवळ आणि केवळ आंबेडकर हे नाव आहे.बरे या स्मारकाचा उपयोग कशासाठी तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह म्हणून करण्यात येणार आहे.वाचनालय,संग्रहालय वगैरे बांधण्यात येणार आहे हे याना माहित आहे?
लंडनला शिक्षणासाठी जाणारे कोण आहेत हे आपल्यासर्वाना माहित आहे.
कुणाला फायदा होणार आहे या डीलचा? कळली का यांची अक्कल आणि महान बुद्धिमत्ता?
आणि त्यातून निपजलेला द्वेष? शेवटी इतकेच म्हणने आहे.

भाजपा सरकारचे हे सरळ सरळ भावनिक प्रश्नात गुंतवणारे राजकारण आहे.
आणि ते स्पष्ट दिसत आहे.यात निदान आंबेडकरी जनतेने भुलून
यांच्या राजकारणाचे बळी ठरू नये असे मला वाटते.
- मिलिंद धुमाळे
(फेसबुकवर गाजलेले)