Rohit vemula death smruti irani sonia gandhi narendra modi University of Hyderabad student Rohith Vemula लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Rohit vemula death smruti irani sonia gandhi narendra modi University of Hyderabad student Rohith Vemula लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० मार्च, २०१६

माध्यमांचा बेजबाबदारपणा ( जेएनयु कन्हैयाकुमार )

जेएनयु विद्यापीठात तथाकथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणात कन्हैया कुमारला सहा महिन्याचा  अंतरिम जामीन मंजूर होऊन तो विद्यापीठात परतला आहे.त्याच्यावर देशद्रोही म्हणून लावण्यात आलेला तथाकथित आरोप हा न्यायालयात सिद्ध करणे अशक्य आहे.हे अनेकदा कायद्याच्या जाणकारांनी स्पष्ट केले होते.तरीही सरकारने हटवादीपणा करत स्वत:चे अवलक्षण करून घेतले.मुळात ज्या देशविरोधी घोषणा दिल्या असं म्हणले जातेय त्यांना पकडण्याऐवजी जो हजरच नव्हता त्याच्यावर खटला गुदरून सरकारने हसे करून घेतले आहे. अलिकडे देशात अन पार्लमेंटमध्ये मजेशीर वातावरण आहे.विरोधी पक्ष नावाला उरला आहे.सूर हरवून बसला आहे.सरकारवर अंकुश ठेवणे हे त्याचे काम.ते काम आज सरकारच्या धोरणांनी त्रस्त जनता करते आहे.याचा अर्थ असा कि देशात विरोधी पक्ष म्हणून जनताच काम करते आहे. हे ऐतिहासिकच म्हणले पाहिजे.आणि यासाठी जागरूक जनतेचे कौतुक देखील केले पाहिजे.

विद्यापीठात परतल्यानंतर कन्हैया कुमारने कॅम्पसमध्ये जे भाषण केले ते जेएनयु कॅम्पसच्या इतिहासात ऐतिहासिक ठरले आहे.भाषणात कन्हैया कुमारने देशाच्या एकूणच भवितव्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.नरेंद्र मोदी आरएसएस एबिविपी आणि भाजपा यांना लक्ष केले होते.खटला न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यावर त्याने भाष्य करणे टाळले मात्र देशविरोधी घोषणाबाजी बाबत वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण दिले. क्न्हैयाच्या या भाषणाने असहिष्णुतेच्या मुद्यावर पुरस्कार वापसी करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यानाही प्रभावित केले. देशातील पक्षविरहीत अन कोणतीही आयडॉलॉजिकल विरहीत असे अनेक तरूण अशा भाषणाने आकर्षित होणे स्वाभाविक आहे.कन्हैयाला देशातील मिडीयाने ज्याप्रमाणे प्रेझेंट केले आहे त्याप्रमाणे तो जबाबदारी पार पाडेल असे म्हणने आताच घाईचे ठरेल.तसे मानण्याचे काही कारणही नाही.कन्हैया नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करत माध्यमांनी एकप्रकारेमात्र कन्हैया ज्या प्रकारे मुलभूत प्रश्न उपस्थित करतो आणि त्यावर उपाय आणि मॅकॅनिझम सांगतो त्यावर इथल्या प्रत्येक तरुणाने राज्यकर्त्याने देशप्रेमी नागरिकाने विचार करणे गरजेचे आहे.तुम्ही कन्हैयावर आरोप असलेल्या काही गोष्टींवर जरूर आक्षेप घेऊ शकता विरोधी करू शकता परंतु त्याने जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत ते तुम्हाला टाळून पुढे जाता येणार नाही.कन्हैयाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते काही १६ मे नंतर उद्भवलेले नाहीत म्हणजे सरकार सत्तेवर आले म्हणून ते निर्माण झालेले नाहीत.ते इथे पूर्वपार होते व हेतूता भिजत दुर्लक्षित करून ठेवण्यात आलेले आहेत.शिक्षण घेण्याची आजादी,आतंकवाद,नक्षलवाद,मनुवाद,भूकबळी ,गरिबी,दारिद्र्य,असमानता,जातीयवाद धार्मिक द्वेष,रोजगार,हे ते प्रश्न आहेत आणि यापासून स्वातंत्र्यमिळाले पाहिजे सुटका झाली पाहिजें असे तो मांडतो हे भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकांचे मत आहे.याच्याशी कुणाची मतभिन्नता असू शकते काय?

गंमत आहे अशी कि हे प्रश्न उपस्थित करूनही माध्यमे सत्ताधारी नेते यांना या प्रश्नांवर चर्चा करावीशी वाटत नाही.सत्ताधारी बेफिकीरीने म्हणतात कन्हैया फुकटची प्रसिद्धी मिळवतो आहे.विरोधी पक्ष पाठ थोपटतो आहे.ज्यांची भावना आहे कि एका देशद्रोह्याला सोडले ते दुषणे देत आहेत.म्हणजे याअगोदर आपण कन्हैया आणि जेएनयु हे अफजल गुरुच्या कथित फाशीच्या मुद्यासाठी न्यायालयाचा अवमान करतात असे समजत होतो  आणि आता त्याच न्याय व्यवस्थेने कन्हैयाला जामीन दिलेला असताना आणि गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्याला आपणच निर्णय देवून देशद्रोही मानून मोकळे होतो हा विरोधाभास नाही काय? त्याच्यावर कुणी जीभ कापायला 5 लाख देत आहे. कुणी गोळी मारायला ११ लाख जाहीर करतो आहे.जणू काही स्पर्धा सुरु आहे.अशी पोस्टर्स राज्यात लावली जात आहेत.कन्हैयावर न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला.पुन्हा कॅम्पसमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय.या गोष्टी पूर्वी तालिबान सिरीयामध्ये कट्टरपंथी आयसीसवाले करत,आता हे आपल्याकडे सुरु झालेय.अशा गोष्टी १६ मे च्या अगोदर घडल्या नव्हत्या हेही तितकेच खरे.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला यावर विचार करावासा वाटत नाही का? हे उद्या आपल्याच प्रियजणांच्या विरोधात घडणार नाही याची खात्री कुणी देवू शकेल काय?
देशद्रोह म्हणजे काय असतं? एखादी वृत्तवाहिनी एडीट केलेले व्हिडिओ आपल्याला दाखविणार आपण त्याची शाहनिशा न करताच जे दाखवले आहे त्यावर विश्वास ठेवणार,मत बनवणार आणि कायदा हातात घेणार?त्या व्यक्तीवरील आरोप न्यायालयात सिद्ध करण्याची वाट आपण पाहणार आहोत कि नाही?
निवृत्त जवानांच्या वन रेंक पेन्शनच्या मुद्यावर जवानांवर लाठीमार करत जखमी करणाऱ्या सरकारला आपण देशभक्त सरकार म्हणन्याचे धाडस करू  शकतो काय? तेच सरकार आध्यात्मिक व्यावसायिक गुरु श्री श्री रवी शंकर यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी देशाच्या सीमेवरील जवानांना राबवून घेते हे कोणत्या देशभक्तीत बसते?
अभिनेते अनुपम खेर पहिल्यांदाच आदित्य योगिनाथ आणि साध्वीच्या विरोधात बोलले ,त्या दोघानी सुद्धा अनुपम खेरना चोख प्रत्युत्तर दिले आहे यावरून त्यांचा आतातरी सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून विश्वास उडाला असण्याची खात्री करायला हरकत नसावी.

वैचारिक प्रतिवाद आणि मुद्दे संपले कि माणूस वैयक्तिक चारित्र्यहनन करण्यात पुढाकार घेतो.सोशलमिडिया आणि प्रसारमाध्यामात कन्हैयाच्या विरोधात सध्या तेच चालू झाले आहे.जे अगोदर रोहितच्या मुद्यावर झाले होते.लोकशाहीच्या या चौथ्या खांबाचे वेगाने अधपतन होते आहे.आजकाल तर प्रसारमाध्यमांतील तथाकथित उच्चभ्रू पत्रकार आपला पेशा विसरून बेधडक वक्तव्य करतात.कन्हैयाचा गरीबीची थट्टा करतात.यात मराठी वृत्तवाहिनीतील एबीपी माझावरील दोन महिला पत्रकार आघाडीवर होत्या.कन्हैयाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना इतरांनी केलेले आरोप हे सनसनाटी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवली जाते.आपल्या व्यावसायिक टीआरपीच्या नादात आपण एका विद्यार्थ्याचे आयुष्य बरबाद करू शकतो याची किमान जाणीव कुणी ठेवताना दिसत नाही. कोणताही आरोप सिद्ध न झालेला व्यक्ती आज लोकांच्या नजरेत गुन्हेगार आहे देशद्रोही आहे.लोकांना तो जिवंत असलेला पहावत नाही.त्याला मारले पाहिजे एवढ्या टोकाची मानसिकता लोकांच्या मनात निर्माण केली गेलीय.रोहितच्या आत्महत्येचे काय झाले?
तपासकार्य कुठवर आले ? हे सरकारने सांगितले पाहिजे.देशात रोज नविन काहीतरी घडवून आणले जाते.आणि  हे प्रश्न मागे पाडतात.विरोधीपक्षाने जाब विचारला पाहिजे. महिषासुर आणि दुर्गा हे मिथक आजच्या घडीला चर्चेला घेणे महत्वाचे नाही.भाजपा शिवसेना आणि त्यांच्या परिघावरील हिंदुत्ववादी संघटना जसे राममंदिर आणि पुराणातील दाखले उकरून त्यावर चर्चा घडवून आणतात आणि इथल्या जनमानसात पुन्हा ते रुजवू पाहतात तसाच हा प्रकार आहे.२१ व्या शतकात बहुजनांचे आणि अभिजनांचे देव मिथकशास्त्र इत्यादीचे वर्गीकरण करत संशोधन करून वाटून घेण्यात हशील नाही.याने समाजाची उन्नती होणार नाही.मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.हे जेएनयु मधील विद्यार्थ्यांनी आणि इथल्या इतर चळवळ्या लोकांनीसुद्धा लक्षात घ्यावे.सामाजिक स्वास्थ्य राखणे हि सर्वांची जबाबदारी आहे.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

रोहित वेमूला ने आत्महत्या नहीं की

स्मरणशक्ती कमकुवत असते म्हणतात समाजाची,म्हणून मग अश्या आठवणी करून द्याव्या लागतात.
रोहिथ मारला हे केव्हाच मागे पडलेलं आहे, आता त्याची नेमकी जात कोणती ह्यावर फक्त कागद रंगवली जाताहेत.
मागच्या वर्षी Milind Dhumale ने लिहिलेल्या लेखाच हिंदी रूपांतर केलेलं ते सगळ्यांना परत आठवण करून द्यायला हि पोस्ट.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणीजीने लोकसभामे जो भाषण दिया है उससे कुछ अनाडी लोग बहुत प्रभावित हुये है ये बात सच है क्युंकी उनका जोश था हि वैसा.ऐसे किसीभी आवेशपूर्ण विवाद या झगडेमे खासकर महिलाये और निखर जाती है , इसमे उनकका अभिनय भी था ऐसा भी लोग मानते है जो लगता तो नही है.
कभी कभी हम जोश मे ऐसी बाते बोलते है जो नही बोलनी चाहिये.शब्द कमान से निकले तीर कि तरह होते है , उसकी जिम्मेदारी भी आपकीही होती है.उसके जो भी अच्छे बुरे परिणाम है उनका सामना भी करना पडता है.” हम अगर शिक्षणप्रणाली का भगवाकरण कर रहे है ये साबित हो जाये तो तो मै राजनीती छोड दुंगी “ ऐसा उन्होने जोश मे कहा तो है उस हिसाब से उन्होने जल्द से जल्द इस्तीफा देकर राजनीती छोड देनी चाहिये.
पुरे पचास मिनिट कि उनके भाषण कि क्लिप दिखाई जा रही है लेकीन उन्होने ये भाषण एकसाथ पचास मिनिट नही दिया है.उनके भाषण समेत उन्हे किये सवाल और उनके जवाब मिलाकर ये क्लिप बनाकर इसे व्हायरल किया गया है ठीक उसी तरह जिस तरह जेएनयु मामले कि क्लिप व्हायरल कि गई थी.सच्चाई ये है कि कईबार सवालोसे तंग आकर ,जवाब ना दे पाने कि वजह से वो अपनी कुर्सिपर वापस बैठ गयी थी.
ऐसे भाषणमे अक्सर हमे उतना हि दिखाया जाता है जितना दिखाना “ वे “ जरुरी समझते है.शायद ये भी कारण है कि लोगोंको उनका भाषण प्रभावी लगा है. भारतीय मिडिया जिंदाबाद और गोबेल्स बाबा जिंदाबाद.
अहम बात ये है कि विपक्ष का ये आरोप है कि वे सिर्फ अपने मंत्रीमंडल के मंत्रियोके चीठ्ठीयो का जवाब देती है.किन किन लोगोंके साथ उनका पत्रव्यवहार है यही बस आजके भाषण का विषय था.रोहीथ वेम्युला मामले मे उन्होने आठ आठ खत लिखे है ,उस बारे मे सफाई देते हुये उन्होने बताया कि १-५-२०१४ से २३-२-२०१६ के बीच मे पुरे देश से उन्हे कुल ६६२३० खत मिले है जिनंमेसे ६१८९२ खतोको उन्होने जवाब भी दिया है.उन्होने पत्र भेजनेवालो कि जाती धर्म के बारे मे कभी जानकारी नही ली है. १२-२-२०१५ को इक्बाल रसूल धर नामके एक काश्मिरी मुस्लीम विद्यार्थीका फेलोशिप के बारे मे जो मुश्कील आयी थी वो उन्होने दूर कि है.
स्मृतीजी ,आपने कभी किसी कि जाती या धर्म के बारे मे पुछां नही ये सचमुच अच्छी बात है ,वैसे भी अपने देश मे नामसे पता चल हि जाता है के उसकी जाती धर्म क्या है.फिरभी आपने इतने खतो का जवाब दिया ये सराहनीय बात है और एक मंत्री के नाते आपका कर्तव्य भी है.लेकीन इन साठ हजार पत्रो मे सिर्फ एक मुस्लीम व्यक्ती का नाम मिसाल के तौर पे देने कि आपपर नौबत आती है ये भी दुर्भाग्यपूर्ण है.
स्मृतीजी ने कहा है कि उन्होने खुद एक अल्पसंख्य समुदाय कि व्यक्ती से शादी कि है, मुझसे राजनीती ना करे.याद रखनेवाली बात ये है कि उन्होने किसी मुस्लीम से नही बल्की एक पारसी व्यक्ती से शादी कि है.भारत मे अक्सर दलित और मुस्लीम समुदायपर अत्याचार होते है नाकी पारसी समुदाय पर ,पारसी समुदाय तो सायलेंट झोन मे है.इसलिये उनके इस दावे मे कोई तथ्य नही
है
.हनुमंत राव कॉंग्रेस के सांसद है जिन्होने कई चीठ्ठीया स्मृतीजी को लिखी है. जिस उपकुलगुरुकी नियुक्ती कॉंग्रेसने कि है उसी के कार्यकाल मे हैद्राबाद विश्वविद्यालय मे दलित विद्यार्थीयोकी खुद्खुशी कि घटनाए दर्ज कि गई है.इस विषय पर आप न्याय करे.ऐसे पत्र हनुमंत राव ने लिखे है.उसका एक स्मरणपत्र ९-१२-२०१४ का है और आगे का पत्रव्यवहार ४-९-१५ / ३०-९-१५ / ६-१०-१५ / २०-१०-१५ /१९-११-१५ /६-१-१६ , मतलब इस विषय मे कुल छे पत्र स्मृतीजीने भेजे है.मान लिया कि स्मृतीजीने ये पत्र भेजे है मगर उसपर क्या कारवाई हुई है उसके बारे मे कोई जानकारी उपलब्ध नही है.मतलब ये उनका सिर्फ आश्वासन है और सबसे गंभीर विषय यह है कि स्मृतीजी २०१४ से ६ जनवरी २०१६ तक हैद्राबाद युनिव्हर्सिटी मे हनुमंत राव को जवाब तो देती है और रोहित कि हत्या होती है १७ जनवरी २०१६ को.
असल चिंता का विषय तो यही है , सिर्फ खत भेजे है ये केहने से या खत भेजने से मंत्रीजी कि जिम्मेदारी खतम होती है ? अगर केंद्रीय मंत्री खुद खत भेजे और फिर भी युनिव्हर्सिटी उसपर हात पर हात धरे बैठती है ? कुलगुरूके उपर कोई कारवाई क्यू नही होती है ? इसबीच स्मृतीजी श्रीमान बंडारू दत्तात्रेय से पत्रव्यवहार करती है , वो आठ खत रोहीथ और बाकी विद्यार्थियोपर कारवाई करने के लिये थी ये बात क्यू बतायी नही है ?स्मृतीजी भावनावश होकर केह्ती है कि मै भी एक मा हु , मुझे भी दुख हुआ है , रोहीथ तो बच्चा था , अगर ये सच मान ले तो फिर बंडारू दत्तात्रय के पत्रो के सहारे युनिव्हर्सिटी पर कारवाई के लिये दबाव क्यू ला रही थी ? स्मृतीजी आप संसद मे झूठ बोल रही है ? क्या आप सत्य और तथ्य उजागर नही कर रही है ?
स्मृतीजी ने कहा है के पुलिस ने तेलंगण हायकोर्ट मे जो दस्तावेज दिये है उसमे लिखा है ,” हमे शाम ७.२० मिनिट पर सूचना मिली , जब हम वहा पहुंचे तब कमरे का दरवाजा खुला था और रोहीथ कि लाश को नीचे उतारकर टेबल पर रखा गया था.उधर एक सुसाईड नोट भी थी जिसमे मौत के लिये किसीको जिम्मेदार ना ठहराने कि बात लिखी है.”
स्मृतीजी “ किसीको जिम्मेदार ना ठहराने “ कि बात पर बार बार इतना जोर क्यू दे रही है ये समझना तो मुश्कील नही.तेलंगण के एक सांसद जिनका नाम मालूम नही हो पाया है वो केहते है , “ मै और मेरे साथी वही घटनास्थल पर मौजूद थे , हमने इंटेलिजन्स ब्युरो चीफ शिवलाल रेड्डी को फोन किया और उन्हे घटना के बारे मे जानकारी दी , ब्युरो चीफ सिर्फ पंधरा मिनिट मे वहापर आगये.वहापर बहोत भीड थी और भीड गुस्से मे थी. ना वो बॉडी को हात लगाने दे रहे थे ना उसे उतारने दे रहे थे. बंडारू दत्तात्रेय को गिरफ्तार करने कि उनकी मांग थी.ये सब जानकारी देणे के लिये जब स्मृतीजी को फोन लगाया तो उन्होने फोन उठाया नही , फिर हमने सीधा प्रधानमंत्रीजी से फोन पर बात करने कि कोशिश कि “ तेलंगण के सांसद को उसी समय स्मृतीजी ने रोका और बातचीत का रुख बदल दिया.ऐसा क्यू किया गया ये तो आप जान गये होंगे.ऐसा क्यू हुवा ये आपको समझना चाहिये.
खैर , उस सांसद कि बात पर विश्वास करे तो पुलिस ने हायकोर्ट मे झुठी बात कही है , स्मृतीजी जो जानकारी संसद मे दे रही है उस बारे मे वे खुद केह्ती है कि ये उनकी जानकारी नही बल्की जो पुलिस ने बात कही है वो मै पढ रही हु.वे केह्ती है , “ पुलिस को वहा सुबह ६.३० बजेतक आने दिया नही गया , रोहीथ को मेडिकल सहायता नही मिली , ना डॉक्टर को बुलाया गया , उसको बचानेकी कोई भी कोशिश नही कि गई. उसे मृत किसने घोषित किया ? ” स्मृतीजी ये सवाल आप किससे कर रही है ?
रोहीथ कि हत्या युनिव्हर्सिटी मे एक कमेरे मे हुई , उस वक्त युनिव्हर्सिटी का प्रशासन क्या कर रहा था ? डॉक्टर क्यू बुलाया नही गया ? रेसिडेंट डॉक्टर युनिव्हर्सिटी था या नही ? इंटेलिजन्स चीफ क्या कर रहे थे ? इन सबको छात्रो को रोक पाना संभव नही था क्या ?अगर छात्र इतनी ताकद से सरकार और युनिव्हर्सिटी के खिलाफ खडे हो गये तो वो रेस्टीकेट(निकाले) कैसे गये ? अगर डॉक्टर ने मौत करार नही दी तो फिर किसने दी ? फिर उसके अंतिम संस्कार जबरन क्यू किये ? तब पुलिस के पास ऐसी कौनसी ताकद आ गयी ? रोहीथ के घरवालो को तक उसका अंतिम दर्शन करने कि अनुमती नही दी गई , उसके अंतिम संस्कार के कागजात पर अधुरी जानकारी क्यू लिखी गयी ? इतनी जल्दबाजी क्यू ? ये सारी जानकारी संसद सदन मे देनी चाहिये थी या स्मृतीजी आप हि सवाल उठा रही है ?
स्मृतीजी ने रोहीथ कि मृत्यू के मामले कि जांच हेतू एक जांच कमिटी गठीत कि थी ? क्या उसके तथ्य सामने आये है ? कि रोहीथ दलित नही था यही पता कर कमिटी चुप्पी साध बैठी है ? उसकी कोई जानकारी क्यू स्मृतीजी सदन को नही दे रही है ? क्या है जो वो छुपा रही है ? अगर कोटा नही है तो छात्र का प्रवेश गैरकानुनी है जिसको भरे सदन मे स्मृतीजीने कबुला है जिसपर कानुनी कारवाई हो सकती है.बहुजन समाज पार्टी अध्यक्ष मायावती ने मांग कि है कि नयी इन्क्वायरी कमिटी गठीत हो और उसमे एक दलित अधिकारी हो , तो स्मृतीजी उसे मान नही रहि है , क्यू ? किस बात का डर है ?बजाय उसके , “ मै अपना सर काटकर चरणो मे अर्पित करूंगी “ ऐसे फिल्मी डायलॉग क्यू फेकना पडा है ?
जोश मे वो केह तो गयी कि अगर हम शिक्षा प्रणाली का भगवाकरण कर रहे है ये साबित किया तो राजनीती त्याग दुंगी.उनकेही मंत्रीमंडल के सदस्य सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा एक साक्षात्कार मे केह रहे थे कि हम पाठ्यक्रम मे रामायण /महाभारत को लाने वाले है. इंडियन एक्स्प्रेस के १०-०९-२०१५ , दिव्यमराठी ११-०९-२०१५ और लोकसत्ता ४-२-२०१६ कि खबरो के अनुसार व्यंगचित्र के माध्यम से रामायण /महाभारत आंगणवाडी स्कुलो मे पढाया जायेगा.कितने ऐसे सरकारी स्कूल है जहा धार्मिक गीत सिखाये जाते है , हिंदू त्योहार मनाये जाते है. भाजप नेता श्री सुब्रमण्यम स्वामी तो राम मंदिर निर्माण के लिये एक वर्कशॉप आयोजित कर चुके है जिसकी शुरुवात जेएनयु मे हुई थी.
ये सब भगवाकरण नही तो और क्या है ?
तो क्या स्मृती इराणी अब राजनीती त्याग देंगी ? क्या अपने पद से इस्तीफा देंगी ?
उन्होने ये घोषणा संसद सदन मे कि है इसलिये महत्वपूर्ण है.
स्मृती इराणी का भाषण सिर्फ भावनाओ का जोश और झूठ का एक बेहतरीन नमुना कहा जा सकता है.
उनके हिसाब से कई बाते बतायी , बहोत सारी छुपायी , पुरा रुख कॉंग्रेस कि तरफ कर दिया था , और उस वक्त सदन मे ना सोनिया थी ना राहुल थे और नाही प्रधानमंत्री मौजूद थे.
- आनंद शितोळे 

रविवार, २४ जानेवारी, २०१६

बुद्धीभेद्यांचे राज्य

हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमूला प्रकरण दिवसेंदिवस चिघळले जात असून,यानिमित्ताने अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत,देशातील आरक्षणधारक मागाससमाज आणि विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची आणि प्रतारणेची भावना घट्ट होत चालली आहे.रोहित वेमूला प्रकरणास सरकारमधील नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थ्यी संघटना ज्या पद्धतीने व्यक्त होत वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरून त्यांची नियत संशयास्पद आणि दलित मागास समूहविरोधी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.मनुष्यबळ आणि विकासमंत्रालय मंत्री स्मृती इराणी यांनी रोहित वेमूला आत्महत्येप्रकरणी धादांत खोटी आणि बुद्धिभेद करणारी विधाने केलेली आहेत.त्या म्हणतात त्यांच्या खात्याने कोणत्याही प्रकारचा दबाव हैद्राबाद युनिव्हर्सिटीवर आणलेला नव्हता,
हे त्यांचे म्हणने मान्य करायचे तर मग त्यांनी विद्यापीठाला कडक कारवायी करा अशा आशयाची पाचपाच पत्रे कोणत्या उद्देशाने पाठविली होती? हा प्रश्न इथे उपस्थित होतो.
स्मृती इराणी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या विद्यापीठाच्या चौकशी समितीमध्ये चौकशीप्रमुख अध्यक्ष “दलित” प्राध्यापक होते.वस्तुस्थिती अशी आहे कि समितीअध्यक्ष किंवा सदस्यसुद्धा दलित नव्हते तर ब्राह्मण होते. हे या मंत्रीबाई का दडवत आहेत?
या त्यांच्या धादांत असत्यकथनामुळे चिडून विद्यापीठातील २० पैकी १० दलित प्राध्यपकांनी आपल्या प्रशासकीय पदावरून राजीनामा दिलेला आहे.
स्मृती इराणी म्हणतात विद्यापीठात काही राष्ट्रविरोधी कारवायी करणारी मुले होती त्यांच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला,रोहित आणि त्याची संघटना हिंसक कारवाया करते,त्यातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थ्यी सेनेच्या अध्यक्षाला मारहाण केली,वस्तुस्थिती अशी आहे कि विद्यापीठाने गठीत केलेल्या चौकशीत कोणतीही मारहाण झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत,आणि हि गोष्ट लिखित स्वरूपात समितीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.याचा अर्थ जो मारहाणीचा कांगावा केला जातो आहे ती प्रत्यक्षात झालेलीच नाहि.वस्तुतः सुशीलकुमारला अपेंडिक्सचा त्रास होता त्याकारणाने त्याला इस्पितळात दाखल करावे लागले होते.स्मृती इराणी म्हणतात रोहित वेमूला ‘दलित’ नाही,केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याप्रमाणे तो ओबीसी प्रवर्गातील होता.त्यामुळे हा दलित-दलितेतर वाद  नाही,यावरून राजकारण करू नये.वस्तुस्थिती अशी आहे कि,रोहितचे कायदेशीर जातप्रमाणपत्र माध्यमांत सादर झाले आहे.त्यानुसार रोहित हा एससी म्हणजे शेड्युल्डकास्ट अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे.याचा अर्थ तो ‘दलित’ आहे हे स्पष्ट होते,दुसरा मुद्दा जर तो ओबीसी प्रवर्गातील असता तरी तो ढोबळमानाने दलितच गणला गेला असता.दलित हि स्थितीवाचक आणि समूहवाचक संज्ञा आहे.हे स्मृती इराणीबाईना माहित नसावे.आणि तिसरा मुद्दा असा आहे कि तो कोणत्याही जाती-जमाती प्रवर्गातील असला तरी एक माणूस म्हणून त्याला न्यायमिळवून देणे हे आपले प्रथम कर्त्यव्य नाही काय? कि थातुरमातुर स्पष्टीकरण देत या प्रकरणावरच वेगळे राजकारण करायचे ? एका विद्यापिठीय घटनेत उच्चस्तरावरील दोन दोन केंद्रीय मंत्र्यांनी इतका रस का घेतला होता हे घटनेचे राजकारण करू नका असे म्हणनाऱ्यांनी सांगितले पाहिजे.हे उच्चस्तरीय राजकारण कसे काय चालू शकते याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.मुख्य म्हणजे मंत्रीबाईना रोहितची जात शोधण्याची आणि तिचा संबंध आपल्या नेत्याच्या जातीशी जोडण्याची घाई हे प्रकरणाला मुद्दाम वेगळे वळण देत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व पाहता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती काय अहवाल देईल याचा पुरेसे अंदाज बांधण्यात काही हरकत नाही.
रोहितच्या बातम्याप्रसार माध्यमात आल्यानंतर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदीची मागणी सोशल माध्यमांत जोर धरू लागल्यानंतर abvp विद्यार्थी सेना सक्रीय झाली. रोहितच्या विरोधात त्यांनी पुन्हा विखारी विषारी प्रचारप्रसार करायला सुरुवात केली.रोहितच्या फेसबुकवॉलवरील पोस्ट वापरून त्याचा चुकीचा अर्थ लावत फोटोशॉप केले गेले.आणि लोकांचा अतिशय पद्धतशीरपणे बुद्धिभेद सुरु केला हे इतके मोठ्याप्रमाणावर आणि संघटीतरित्या सुरु झाले कि हे लोक याच संधीची वाट पहात होते कि काय असा संशय निर्माण होतो आहे.  
कधी रोहित हा नक्षलवादाशी संबंधित आहे तर कधी डाव्या कम्युनिस्ट चळवळी संबंधित आहे अशा प्रकारची वक्तव्य आणि लेख/पोस्ट लिहिले जाऊ लागले आहेत. याकुबच्या फाशीला विरोध केला असाही धादांत खोटा प्रचार केला जात आहे.देशद्रोही मेला असे म्हणून विकृत आनंदही व्यक्त केला जातोय.एकीकडे त्याला देशद्रोही म्हणायचे नक्षलावादी म्हणायचे दुसरीकडे त्याला श्रद्धांजली  देखील वहायचे नाटक करायचे असे प्रकार abvp ने सुरु केले आहेत.आपली भूमिका कधीच समजू न द्यायची काळजी हिंदुत्ववादी पक्ष संघटना या नेहमीच घेत आलेल्या आहेत.सतत बुद्धिभेद करत राहण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.आपल्याच पक्षातील नेते आणि संबंधित संघटना या मृत्यूनंतरही रोहितला बदनाम करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहितला मृत्यूनंतर गौरान्वित करत “भारतमातेने सुपुत्र गमावला मला,अतिशय दुःख झाले”असल्याची भावना व्यक्त करतात तेव्हा सामान्य माणूस बुचकळ्यात पडल्याशिवाय रहात नाही.नरेंद्र मोदीना खरे मानायचे तर स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे खोटे आणि उघडे पडतात आणि जर या दोघांचे म्हणने मान्य करायचे तर पंतप्रधान खोटे ठरतात असा पेच निर्माण झालेला आहे.त्यामुळे सामान्यनागरिकांच्या मनात संभ्रम आहे.
नरेंद्र मोदीच्या याच कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी “मोदी गो-ब्याक” "रोहित वेमूला अमर रहे" अशा घोषणा दिल्या होत्या,आता त्या विद्यार्थ्यांवरही निलंबनाची तलवार लटकली आहे.
रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणार्यांना भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्यमस्वामी यांनी वादग्रस्त वक्त्यव्य करत कुत्र्याची उपमा दिली आहे.अशीच उपमा मागे याच पक्षाचे एक नेते व्हि के सिंह यांनी दलित-ओबीसी मुलांच्या जळीत प्रकरणी दिलेली होती.याअगोदर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांसंबंधी एका वक्त्यव्यात त्यांची तुलना कुत्र्याच्या पिलाशी  केली होती.यावरून भारतीय जनता पार्टी दलित-मुस्लिम समाजाला कोणत्या नजरेतून पाहते हे लक्षात येते.अलीकडेच असहिष्णुतेच्या मुद्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी एक मोर्चा आयोजित केला होता.तेच अनुपम खेर आता एका व्हिडीओद्वारे काश्मिरी पंडितांच्या मुद्यावर आव्हान देताना दिसत आहेत,हा व्हिडीओ कोणत्याही हिंदुच्या भावना भडकतील अशा पद्धतीने बनविण्यात आला आहे,सरकार भाजपाचे असताना हा मुद्दा व्हिडीओद्वारे लोकांसमोर न्यायची गरज का वाटते? हा मुलभूत प्रश्न आहे.रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी याच सरकारचे नेते,आता व्हिडीओ आणि शिलापूजन जोरात सुरु आहे त्यामुळे छातीत धडकी भरते.काळजी वाटते.सरकार गरीब जनतेच्या संरक्षणासाठी आहे कि जातीय आणि धार्मिक धृवीकरण करत तेढ निर्माण करणारे राजकारण करत आत्महत्येद्वारे मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडणारे आहे.
भाजपासरकारला या देशात नक्की काय हवे आहे हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे.

बुधवार, २० जानेवारी, २०१६

रोहित वेमुलाने आत्महत्या केली नाही

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात विज्ञानसंशोधन विषय घेऊन पीएचडी करत असलेल्या २८ वर्षीय रोहित वेमूला या स्कॉलर विद्यार्थ्यावर २१व्या शतकातही सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागल्याने मानसिकदृष्ट्या खचून जाऊन वसतीगृहातील खोलीतच रविवारी रात्री गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारमधील काही मंत्री,हिंदुत्ववादी विद्यार्थ्यी संघटना यांच्यामार्फत जातीयद्वेषातून अन्यायकारक अशी सामाजिक बहिष्कृतता लादून विद्यापीठाची प्रशासकीय इमारतवसतीगृहकॅन्टिनग्रंथालयासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती.या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत सोमवारी सकाळपासून यास जबाबदार असलेल्या विद्यीपीठ प्रशासन आणि भाजपचे केंद्रीय श्रममंत्री व आरएसएस सदस्य बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली असून तेलंगणा बंदची हाक देण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे पाहूया.
रोहित वेमूला हा (ASA) आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता.
३० जुलैला याकुब मेननला फाशी देण्यात आली तेव्हा देशात फाशीची शिक्षा असावी कि नसावी हा वाद बराच रंगला होता,त्यानिमित्ताने एक चर्चासत्र हैदराबाद विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चासत्रात ASA आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थ्यीविंग आहे.यांच्यात फाशीच्या मुद्यावरून मतभेद झाले होते.आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे असे म्हणने होते कि याकुबला सश्रम कारावास जन्मठेप दिली जावी.त्याच्याकडून आणखी काही माहिती धागे-दोरे मिळतात का हे पाहिले जावे.तर दुसरीकडे ABVP चे म्हणने होते याकुबला फाशीच व्हायला हवी.गुन्हेगारांना फाशी द्यावी कि न द्यावी याविषयी देशात अनेक वेगवेगळी मते आहेत.याकूबची फाईल दहाव्या नबंरवर असताना सरकारने याकुबला फासावर लटकाविण्याची घाई केली.ABVP संघटना हि भाजपासरकारचाच एक भाग असल्यामुळे त्यांनी याकूबच्या फाशीवर जोर देणे स्वाभाविक आहे.देशातील सत्तांतरामुळे देशात असहिष्णुतेचे वातावारण असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील काही विद्यार्थ्यांनी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनवर फाशीला विरोध करतात म्हणून देशद्रोही असल्याची टिप्पणी केली.यामुळे दोघांमध्ये खटका उडाला होता.
याविषयीचा वाद विद्यार्थ्यांच्या फेसबुकवरपेजवरही काही दिवस पहायला मिळत होता.पुढे ऑगस्ट 03/08/2015 आणि 04/08/2015 ला दिल्ली विद्यापीठात “मुझ्झफरनगर अभी बाकी है ह्या बहुचर्चित माहितीपटाचे प्रदर्शन आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने आयोजित केले होते,ते होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध करत हिंसक निदर्शने केली होती.हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता.त्यामुळे पुन्हा दोघांत संघर्षाची ठिणगी उडाली.
माहितीपटाचे प्रदर्शन झाल्यामुळे चिडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष सुशीलकुमार याने आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना फेसबुकपेजवर अपशब्द वापरले.त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली.सदर प्रकाराबाबत विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकार्यांच्यासमोर सुशीलकुमारने माफी मागितली खरी परंतु तो राग मनात ठेवून सुशीलकुमारने त्याच रात्री स्वत:ला हैद्राबादमधील अर्चना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.पोलिसांत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची खोटी तक्रार दाखल केली.यात ज्या पाच विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली ते या प्रकरणात कुठेच हजर देखील नव्हते.विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकारी प्रा.आलोक पांडे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सुशीलकुमारवर कुणीही शारीरिक मारहाण किंवा हल्ला केला नसल्याचा अहवाल दिला.परंतु तरीही अनाकलनीयपद्धतीने संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाचे आदेश दिले गेले.या आदेशाच्या विरोधात सर्व पुरोगामी आणि लोकशाहीवादी विद्यार्थ्यी संघटनानी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला.तेव्हा माजी कुलगुरू प्रा.पि शर्मा यांनी सदर विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले पुन्हा नव्याने चौकशीसाठी आणखी एक समिती नेमली.
याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थ्यी केंद्रीय श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याकडे गेले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि भाजापाचीच विद्यार्थ्यी विंग असल्यामुळे बंडारु दत्तात्रय यांनी यात जातीने लक्ष घालून ताबडतोब केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना १७/०८/२०१५ ला पत्र लिहून विद्यापीठाला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा आशयाचे पत्र पाठवलेत्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सदर विद्यापीठाला तत्काळ स्पष्टीकरण मागत चौकशी करून कारवायी करण्याचे आदेश पत्रात दिले.यावर पुन्हा अगोदरच्या समिती बरखास्त करत नविन दोन सदस्यीय समिती नेमली गेली.दोन पोलीस दोन सुरक्षा रक्षक आणि दोन तक्रारदार यांच्या जबानीवर विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेत विद्यापीठ प्रशासन सदर विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले.विद्यापीठाची प्रशासकीय इमारतवसतीगृहकॅन्टिनग्रंथालय यासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आले. विद्यापीठ प्रशासन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भाजपाचे मंत्री यांच्या संगनमताने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागले.विद्यापीठीय राजकारणाने निरपराध विद्यार्थ्याना उध्वस्त करत त्यांच्या करिअरचा बळी घेतलाच त्यात एकाचे आयुष्यही हिरावून घेतले गेले. याविरोधात आता  तेलंगणाच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थींनी संघटनांनीही रोहितच्या आत्महत्येचा निषेध केला आहे.
सर्वच स्तरातून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात गलीच्छ राजकारण दंडेली आणि दहशत निर्माण करणाऱ्या ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे.सदर संघटना हि घटना विरोधी कृत्यात अनेकदा सहभागी असल्याचे दिसून येते. काही ठळक घटना पाहिल्या तर चेन्नई मधील IIT संस्थेत एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या गोमांस भक्षण आणि हिंदीप्रभुत्ववादाच्या धोरणाबद्दल चर्चा झाली आणि त्यातून या मुद्द्यांना विरोध झाला आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विध्यार्थी संघटनेविरुद्ध ABVP संघटनेने बंदीची मागणी घातली सदर कार्यक्रमाचे रिपोर्टिंग थेट मनुष्यबळ मंत्रालयाला केले गेले आणि तिथून ताबडतोब बंदीचे आदेश निघाले या बंदीला झालेल्या जोरदार विरोधामुळे सरकारने शेवटी माघार घेतली.त्यानंतर एफटीआयआयमध्ये सरकारपुरस्कृत गजेंद्र चौहान आणि अजून पाच सदस्यांच्या नियुक्तीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उपोषण केले,त्यांना धमकावण्याचे काम या संघटनेने केले आहे. मागे मुंबईतील सेंटझेवियर्समध्ये शाहीर शितल साठेचा कार्यक्रम होता तो धमक्या मनगटशाहीच्या जोरावर ABVP संघटनेने होऊ दिला नाही. त्यानंतर तीन तारखेला सोलापूर येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून कार्यक्रम उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनीच चोप देवून त्यांना पळवून लावले. यावरून सदर संघटना शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक आहे हे स्पष्ट होते.घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संघटनेला मान्य नाही.तसेच तीला सत्ताधारी सरकारचे पाठबळ असणे हे अत्यंत घातक आहे.या सर्वांचा नीट विचार केला तर असे दिसून येते कि भाजपासरकार पद्धतशीरपणे इथे विशिष्ट विचारसरणी रूजवू पहात आहे.
आणि मागासवर्गांना शिक्षणापासून तोडण्याचे उद्योग करत आहे.
एकीकडे सबका साथ विकासच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे सामाजिक बहिष्कृततेच्या प्रथा शिक्षणक्षेत्रात राबवायच्या,आरक्षणाला विरोध नाही म्हणायचे आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचा आग्रह धरायचा,मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लावायची आणि दुसरीकडे शिक्षणक्षेत्रात गुंड संघटना वाढवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करायची त्रास द्यायचा हिंदुत्ववादी अजेंडे राबवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे उद्योग करायचे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या प्रोक्टोरियल चौकशीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना गुंड म्हणायचे त्यांनी याकूबला समर्थन दिले म्हणून देशद्रोही म्हणायचे असे खोटेच प्रचार आता हि संघटना करत असून त्यांच्या राजकारणाने झालेल्या खुनाचे एक प्रकारे समर्थन करण्याचा उद्योग चालू झाला आहे.भाजपा आरएसएसचे धार्मिक आणि जातीय धृवीकरण देशाला नविन नाही.हे सर्व पाहता हि ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे असे म्हणता येते. हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद आहे. आणि जे घटक विचारसरणी यास विरोध करेल ते राष्ट्रद्रोही आहेत.हि भाजपा संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांची संकल्पना आहे.याच खुळचट भावनेतून आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कारवायी केली गेलीय.त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील नेत्यांच्या संगनमताने घडवून आणलेला हा खून आहे असे विविध पुरोगामी डाव्या आणि मागासवर्गीय संघटनाचे म्हणने आहे. भाजपासरकार संबंधित नेत्यांचे राजीनामे घेऊन त्यांना शासन करणार कि नाहीत्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवला जाऊ नयेअशा संघटनावर बंदी घालून शिक्षणक्षेत्र दहशतमुक्त करणार कि नाही?

चंद्रशेखर आझाद इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले,चन्द्रशेखर आझाद यांची हि आत्महत्या नाही. रोहित वेमूलाने हेच केले.अशी भावना आता देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनात जोर धरू लागली आहे.भडकलेली हि तरुणांची आग सरकारला अडचणीचे ठरेल यात शंका नाही.
सोशल मीडियातही तरुण वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. ‪#universityofhyderabad ‪#Rohit_Vemula ‪#BanABVP हे हॅशटॅग ट्रेंड दिवसभर दिसत होतेत्यामुळे तरुणांची भावना लक्षात येते. दिल्ली युनिव्हर्सिटी मुंबई कलिना युनिव्हर्सिटीसह देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यासाठी तरुण एकवटले आहेत.
एका निरपराध विद्यार्थ्याला अशा प्रकारे आपले जीवन संपावायला लागणे हे तरूणांची संख्या जास्त असलेल्या देशासाठी लाजिरवाणे आहे.


Translate