भारतात हिंदु धर्मीय हे बहुसंख्य आहेत.
त्यामुळे त्यांचे सणउत्सव हे इतर धर्मीय लोकांच्या तुलनेत जास्त
असणार
आणि मोठ्या प्रमाणावर साजरे
केले जाणार हे स्वाभाविक आहे.
त्याचबरोबर या धर्मात इतर
धर्मांपेक्षा जास्त रूढी परंपरा असणार हे ओघाने आलेच.
आपण जेव्हा कोणत्याही
अवैज्ञानिक त्रासदायक आणि मानवी आरोग्याला
व पर्यावरणाला घातक सण उत्सव अनिशिष्ट रूढी प्रथा
परंपरा आणि एकूणच अंधश्रद्धा
याबद्दल बोलतो तेव्हा कट्टर हिंदुत्ववादी
मित्र म्हणतात कि तुम्ही मुस्लिम धर्माविषयी
का बोलत नाही? तिकडे सुधारणा का करत नाही.ख्रिस्ती धर्माविषयी का बोलत
नाही?
नेहमी हिंदू धर्माबद्दल का
बोलता? नेहमी
हिंदु धर्माला टार्गेट का करता?
असा त्यांचा एकूण पवित्रा
असतो.तसे पाहिले तर सकृतदर्शनी हि भूमिका गैर वाटत नाही.
परंतु खरेच हे स्विकारण्यास
योग्य आहे काय? तर
याचे स्पष्ट उत्तर नाही असेच द्यावे लागते.
समाज सुधारक प्रबोधनकार हे
हिंदु धर्माला टार्गेट करतात हा दावाच मुळात
धर्म आणि रूढी याबाबतीतील अज्ञान आणि
विशिष्ट धार्मीक राजकारणाचा भाग म्हणून
पुढे आलेला आहे,जो काही खरा नाही.
मुद्दा असा आहे अगोदर आपण हि
गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि
एक समाज म्हणून समाजात राहणारे
सर्व घटक हे या समाजव्यवस्थेचेच
एक भाग आहेत घटक आहेत.
केवळ हिंदूची म्हणून अशी वेगळी
आणि स्वतंत्र समाजव्यवस्था भारतात उपलब्ध नाही.
ना तशी ती इतर कोणत्या धर्माची
आहे.
मुळात भारत हे एक निधर्मी आणि
धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
आणि मुख्य म्हणजे भारतात
लोकशाही आहे.बहुसंख्य भारतीय नागरिकांनी
लोकशाही हि आपली जगण्याचे साधन
व नियम व्यवस्था म्हणून स्वीकारली आहे.
घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर
म्हणत लोकशाही म्हणजे केवळ प्रजासत्ताक किंवा
संसदीय कार्यप्रणालीचे सरकार
किंवा व्यवस्था नसून ‘सहजीवनाने राहण्याची जीवन पद्धती’ आहे.
आता आपल्या कट्टर हिंदू धर्मीय
मित्रांच्या आक्षेपाबद्दल आपण बोलू.
धर्म चिकित्सा हि काही
कालपरवाची संस्कृती नाही. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा
आणि सण उत्सव
त्याअनुषंगाने निर्माण झालेली अंधश्रद्धा याबद्दल पुराणकाळापासूनच
सुधारणेची
परंपरा राहिलेली आहे. आज काहीप्रमाणात ‘सुधारलेला’ हिंदू धर्म म्हणून जे रूप आहे
ते समाजातील अनेक संत समाजसुधारक प्रबोधनकार
यांनी पैलू पाडत आणलेले आहे.
हे कुणालाही अमान्य करता येत
नाही.
समाजसुधारकांचा रोख हा नेहमी या
अनिष्ट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा यांना राहिलेला आहे.
त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या
प्रमाणात हाताच्या बोटावर मोजण्याइतके समाजसुधारक
समाजात असले तरी त्यांना समाजाने
आणि सामान्य हिंदू व्यक्तीने आपले मानले
आपला मार्गदर्शक मानले.आणि त्याच्या मार्गदर्शनाने
वाटचाल केली.त्यामुळे त्याची प्रगती झाली.
आपला फायदा कशात आहे हे त्याला
समजू लागले.
समाजसुधारक हे आपल्या धर्माचे
शत्रू आहेत कि उत्कर्ष करणारे मार्गदर्शक हे त्याला चांगले कळते.
समाज सुधारकांचे सामाजीकप्रबोधन
हे देव-धर्माच्या नावाखाली शोषण फसवणूक
आणि लुबाडणूक करून मुठभर लोक चंगळवादी जीवन
जगतात
या प्रवृत्तींच्या विरोधातील लढा आहे.हे त्याला समजले.
परंतु आज चित्र फारसे बरे नाही
तर भयावह आणि भयंकर आहे.
कारण सामान्य हिंदु व्यक्ती हा
काही मुठभर शोषण करणाऱ्या चंगळवादी झुंडशाहीच्या
अपप्रचाराला बळी पडत चाललेला
आहे. धर्मातील वाईट प्रथा शोषण फसवणूक यांच्या विरोधात बोलणे म्हणजे “धर्मद्रोह” या गोबेल्सनितीने
केलेल्या अपप्रचाराचा तो बळी ठरतो आहे.
चूकिच्या प्रथा अंधश्रद्धांच्या
विरोधात बोलणे म्हणजे धर्माच्या विरोधात बोलणे
असा अपप्रचार काही कट्टर
हिंदुत्ववादी पक्ष संघटनानी केल्यामुळे
सामान्य हिंदू धर्मीय व्यक्ती संभ्रमीत
झालेला आहे.
कट्टर हिंदुत्ववादी संघटना,पक्ष यांच्याकडून वारंवार हिंदू धर्म सहिष्णू आहे असे सांगितल्या जाते.
असे काही आहे काय याचा शोध
घ्यावा लागेल.
हिंदू धर्म म्हणून नेमके काय
आहे याचे सर्वमान्य उत्तर कुणालाही देता येत नाही.
हिंदू धर्मातील वेद उपनिषदे ऋचा
पुराण कथा महाकाव्यादी ग्रंथ रामायण महाभारत
कायदा ग्रंथ मनुस्मृती त्यातील
नियम प्रवाद अतिरंजीत लढाया कट कपट कारस्थाने पाहिल्या
तर सहिष्णुता आपल्याला शोधावी
लागते.पण ती सापडत नाही.
जगाच्या पाठीवर आपला भारत हा
एकमेव देश जीथे आपल्याच समाजबांधवांवर
आपण क्रूर म्हणावे नृशंस म्हणावे
असे अमानवीय अत्यचार केले हजारो वर्षे हे चालूच होते.
त्यांना बहिष्कृत करून
जनावरांपेक्षा हिन लेखले.
ज्या पाणवठ्यावर जनावरे पाणी
पित ते पाणी सुद्धा आपल्या समाज बांधवांना
आपण पिण्यास मनाई केली होती.हे
वर्णन आज वाचले तरी अंगावर काटा उभा राहतो
अतिरंजीत वाटते आणि हे घडले
असेल असे मनाला पटणानार देखील नाही.
परंतु हे सत्य आहे हा आपला थोर
जाज्वल्य इतिहास आहे.
आणि याची पुनरावृत्ती देशात
अजूनही कुठे ना कुठे होत असते.
त्यामुळे सहिष्णुता आहे असे
मानायला कुणाचे धाडस होत नाही.
मग हिंदू धर्मातील सहिष्णुता
कशात आहे? तर
सामान्य हिंदू धर्मीय व्यक्तीमध्ये ती आहे.
धार्मीक शिकवण विचार आणि आचार
यात खूप फरक आहे.
अशा व्यक्तीला २४ x ७ धर्म धारण करावा लागत नाही रोजच्या जीवनात तो कुठेही आड येत नाही.
त्या व्यक्तीला सुधारणा
महत्वाच्या वाटत असतात.
आणि अशीच व्यक्ती हि
हिंदूधर्मीय असली तरी ती ‘पुरोगामी’ असते.
त्यामुळे आपण कट्टर
हिंदुत्ववादी संघटना,संस्था व राजकीय पक्ष आणि
एक सामान्य हिंदू धर्मीय
व्यक्ती यांच्यात फरक केला पाहिजे.
कारण आपण अनेकदा हे वाक्य ऐकले
असेल कि दहशतवादाला धर्म नसतो.
दहशतवादी हे कोणत्याही धर्माचे
नसतात. त्याना धर्म नसतो.
हे वाक्यच
भंपक आणि फसवे आहे.
दहशतवाद
जोपासला जातो.
धर्म
वाढविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी मुठभर मुलतत्ववादी लोकांच्या
आर्थिक
आणि सामाजीक उद्दिष्टपुर्तीसाठीच धर्म युद्ध खेळली जातात.
यात बळी
जातो तो या सामान्य लोकांचा ज्याच्या आयुष्यात
याला काही महत्व नसते.
एक ठराविक
तिथी तारीख सण सोडले तर कोणत्याही धर्माशी
सामान्य माणूस या सर्वांपासून
अलिप्त असतो.
त्याला केवळ आपल्या “उद्याचे काय” याची चिंता असते.
१९९२ ला जेव्हा कट्टर
हिंदुत्ववादी संघटना आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद म्हणजे
भाजपा यांचे कारसेवक यांच्या
करवी अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली गेली
त्यानंतर उसळलेल्या
हिंदू-मुस्लीम धार्मीक दंगलीत याची अनेकांना प्रचीती आली.
अनेक सामान्य हिंदू धर्मीय
नागरिकांनी मुस्लीम धर्मीय नागरिकांना
आपल्या घरात आश्रय देवून त्यांच्या प्राणांचे
रक्षण केले तसे अनेक मुस्लीम धर्मीय नागरिकांनी
हिंदू धर्मीय नागरिकांना आपल्या घरात आश्रय देवून
त्यांच्या प्राणांचे रक्षण केले.
या सर्वांना आपला धर्म हा
दुय्यम वाटत होता आणि माणुसकी हाच एकमेव धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे.
हि भावना
त्यांच्या मनात होती.त्याशिवाय हे घडणे अशक्य आहे.
सामान्य जीवनात कोणत्याही
प्रकारची सामाजीक धार्मीक अस्पृश्यता न पाळणाऱ्या
सामान्य नागरिकांना या धार्मीक
दंगलीशी काहीही देणेघेणे नव्हते.
आता प्रश्न आहे धर्मावर
होणाऱ्या टीकेचा, तर
टीका हि मुळात धर्मावर होत नसून त्यातील चुकीच्या संकल्पनाना होते. मानवी
स्वातंत्र्याचा संकोच बाळगणे भ्रामक रूढी परंपरा पाळणे आणि कर्मकांडातून
अंधश्रद्धा जोपासणे,नागरिकांचे आर्थिक शारीरिक शोषण करणे या
प्रथांना समाजसुधारकांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे.ना कि धर्माला त्यामुळे
सामान्य नागरिकानाही आज त्या गोष्टी पटत आहेत.
तो स्वत:ला या गोष्टींपासून दूर
ठेवतो आहे.नकार देतो आहे.
यात गंमत अशी कि या अनिष्ट रूढी
परंपरा आणि त्याअनुषंगाने केले जाणारे कर्मकांड हे काही मुठभर वर्गासाठी रोजगार
हमी योजने सारखे असल्यामुळे आणि तोच त्यांचा मुख्य आर्थिक स्रोत असल्यामुळे चंगळवादी
आयुष्य उपभोगण्याचे आणि इतरांवर धार्मीक सत्ता गाजविण्याचे ते एक माध्यम बनले आहे
त्यामुळे या वर्गाने अशा अनिष्ट गोष्टींना विरोध करणाऱ्या समाजसुधारकांच्या
विरोधात मोहीम उघडली.त्यासाठी अनेक प्रक्षोभक भाषणे केली विविध पातळीवर मोहिमा
उघडल्या सतत सुधारने विरुद्ध अपप्रचार केला. अंधश्रद्धा निर्मुलन संदर्भातील कायदा
करताना कट्टर हिंदुत्ववादी पक्ष संघटनानी अपप्रचाराचे रान उठवून हा कायदा
धर्मविरोधी असल्याचा जो बनाव केला आणि द्वेषाचे राजकारण केले ते आपण सर्वांनी
अनुभवले आहे. अलीकडे समाजसुधारकांना “पुरोगामी दहशतवादी” संबोधून त्यांना समाज आणि धर्मद्रोही ठरविले जात आहे.जेणेकरून सामान्य
लोकांची ते सहानुभूती आणि समर्थन हरवून बसतील.
आणि त्यांच्यावर हल्ले झाले खून जरी
पाडले तरी
समाजातून त्याच्यासाठी चांगल्या
प्रतिक्रिया येवू नये.
उलट जे झाले ते योग्य अशी भावना
जाणीवपूर्वक निर्माण केली जातेय.
यावरून लक्षात येते कि
समाजसुधारकांना धर्म विरोधी ठरवून त्यांची हत्या करण्याची जोरदार मोहीम कट्टर
पंथीय माथेफिरू लोकांनी अवलंबली आहे.यात अनेक समाजसुधारक विचारवंतांनी आपले प्राण
गमावले आहेत. स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे मुलतत्ववादी हे दहशत निर्माण करून
या सुधारणा रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. सुधारणा झाल्यातर त्यांच्या
फायदा बहुसंख्य समाजाला होणार आहे या मुठभर वर्गाचे आर्थिक स्रोत बंद होणार आहेत
त्यामुळे त्यांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समाजसुधारणेला विरोध करण्याशिवाय
पर्याय नसतो.
मग त्यांचा शोध सुरु होतो तो
बेरोजगार आणि दिशा नसलेल्या तरुणांना शोधण्याचा त्यांना धर्म तत्वज्ञानाच्या
नावाखाली दहशतीचे प्रशिक्षण देवून नोकरी रोजगार आणि एक सुजाण सुबुद्ध नागरिक
बनविण्याऐवजी धर्माच्या रक्षणासाठी आपले आदेश मानणारे यंत्रमानव म्हणून तयार केले
जाते आणि त्यांच्या करवी या हत्या घडवून आणल्या जातात.
एक चांगली गोष्ट हि आहे कि अशा
माथेफिरूंच्या कट्टर धार्मिक संघटनाना मोठ्या प्रमाणावर असलेल्या सामान्य पुरोगामी
हिंदू नागरिकांचा पाठिंबा समर्थन नाही.नाहीतर देशाची स्थिती सिरीया इराक बगदाद
सारखी झाली असती आणि ISIS प्रमाणे या संघटनानी इथली
लहान मोठी शहरे ताब्यात घेतली असती.
एक समाज म्हणून समाजात राहणारे
सर्व घटक
हे या समाजव्यवस्थेचेच एक भाग
आहेत घटक आहेत.
केवळ हिंदुंची म्हणून अशी वेगळी
आणि स्वतंत्र समाजव्यवस्था भारतात उपलब्ध नाही.
आपण समाज म्हणून जेव्हा एकत्र
राहतो तेव्हा एक समाजघटक म्हणून आपल्या कृतीचा त्रास
हा इतरांना होता कामा नये
याची काळजी आपण स्वत: घ्यायला हवी.
तसेच हे सर्व धर्मीय नागरीकांनीही हे लक्षात घ्यायला हवे .
एक जबाबदार आणि सुजाण नागरिक
म्हणून आपले ते कर्तव्य आहे.
मी जर हिंदू बहुल धर्मीय भागात रहात असेन तर त्यांच्याकाही अनैसर्गिक गोष्टींचा त्रास मला होत असेल तर मला त्याबद्दल बोलणे भाग आहे.
मी जर मुस्लीम किंवा ख्रिश्चन बहुल धर्मीय असणाऱ्या वस्तीत रहात असेन आणि त्यांच्या काही अनैसर्गिक गोष्टीचा मला त्रास झाला तर त्याबद्दल मी जरूर बोलेनच.
आपले सण उत्सव हे लोकांना आनंद
देण्यासाठी आणि वातावरण प्रसन्न करण्यासाठी आहेत
कि नागरिकांचे आरोग्य धोक्यात
घालून पर्यावरणाचे संतुलन बिघडविणारे व वातावरण प्रदूषित करणारे आहे.
याचे भान आपण
राखणे गरजेचे आहे. त्यामुळे एखाद्या समाज घटकाला
आपल्या अनैसर्गिक कृतीचा त्रास
होत असेल तर त्यांचे म्हणने ऐकून घ्यायला हवे.
“तू आमच्यावर टीका करू
नको” असे
म्हणने हे समाजशील असण्याच्या भूमिकेच्या विरुद्ध वर्तन आहे.
आपण “समाज” म्हणून ज्याला संबोधतो
त्या समाजात अनेकविध घटक एकत्र नांदत असतात.
समाज आपल्या एकट्याचा नाही.हे
आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.
त्यामुळे उद्या कुणी आपल्यावर
टीका केली तर त्याबद्दल वाईट वाटून न घेता
त्याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची
गरज आहे त्यानुसार बदलण्याची गरज आहे.
एकमेकांचा आदर आणि सहजीवन यातच
सर्वांचे आणि देशाचे हित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा